मुंबई- दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्याच पुर्नपरीक्षा घेण्यात येणार आहे.अशी घोषणा आज येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेतून केली.
तावडे यांनी सांगितले की, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होईल. या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून पुढील शिक्षण घेता येईल. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नापास विद्यार्थ्यांना ऑक्टोबरपर्यंत थांबावे लागणार नाही. तसेच त्यांचे एक वर्ष वाचणार आहे.नापास विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.