नवी दिल्ली :ये जमीं रुक जाये …. आसमां झुक जाये … तेरा चेहरा जब नजर आये… राणी मुखर्जी ला घेवून गायलेले गाणे आठवतंय .. होय एकीकडे भारतात काही कलाकारांना अस्वस्थ वाटत असताना पाकिस्तानच्या या ग्रेट गायकाने आता भारतीय नागरिकत्व मिळविले आहे . पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारत सरकारनं नवीन वर्षांचं एक मोठ्ठं गिफ्ट दिलंय. अदनानला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान ‘भारतीय’ होणार आहे.भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी अदनान सामी गेल्या अनेक दिवसांपासून धडपड करत होता. अदनानच्या या अर्जाला गृह मंत्रालयानं हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे, येत्या वर्षाचं स्वागत अदनान एक ‘भारतीय’ म्हणून करणार आहे. लाहोरला जन्मलेला अदनानचा १३ मार्च २००१ रोजी पहिल्यांदा भारतात आला होता.