एस.ए.ई. च्या स्टुडंट्स इंडस्ट्री एज्युकेशन प्रोग्रामच्या माहिती पुस्तकाचे अनावरण
पुणे :
एस.ए.ई.च्या ‘सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनियर्स ऑफ इंडिया’ ‘स्टुडंट्स इंडस्ट्री एज्युकेशन प्रोग्राम (साईन 2015)’ चे माहिती पुस्तिकेचे अनावरण ‘एसएई इंटरनॅशनल’चे अध्यक्ष डॉ. रिचर्ड ग्रीव्हज् यांच्या हस्ते अलीकडेच नगर रस्त्यावरील हॉटेल ‘फोर पॉइंट शेरेटन’ येथे झाले.
यावेळी डॉ. के.सी.व्होरा (ARAI Deputy Director), मुरली अय्यर (Executive Advisor-Global, SAE International), सतीश नाडीगर (Country Manager, John Deere), रफीक सोमानी (Country Manager, ANSYS), सजीत परमबिल (Director, PTC), नितीन चाळके (Managing Director, Eaton), रिचर्ड र्व्हीलँड (CTO, Cummins India), डॉ. रश्मी उर्ध्वरेषे (Director, ARAI), संजय मांडेकर (Sr VP, YES Bank), जॉर्न हमर (Sr VP, YES Bank), अमर वारियावा उपस्थित होते.
ए.आर.ए.आय. (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) तसेच अवजड वाहननिर्मिती क्षेत्रातील ‘ऑफ हायवे बोर्ड इंडस्ट्रिज’ या कंपन्यांच्या सहकार्याने 2013 साली या उपक्रमाची सुरुवात झाली. महिला अभियंत्यांनी अवजड वाहननिर्मिती क्षेत्रात यावे, यासाठी प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे, असे ए.आर.ए.आय.च्या संचालक आणि एस.ए.ई.इंडियाच्या उत्तर विभागाच्या अध्यक्ष रश्मी उर्ध्वरेषे यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत 50 महिला अभियंत्यांना दोन आठवडे प्रशिक्षण व्यक्तिमत्त्व विकसन आणि इंडस्ट्री व्हिजिटचा अनुभव दिला जातो. देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांची निवड केली आहे.
हा उपक्रम भारतीय अभियंत्यांसाठी उपयुक्त संधी ठरेल, असे उद्गार यावेळी बोलताना डॉ. रिचर्ड ग्रीव्हज् यांनी काढले.