पुणे :
‘एसएई’ इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), इटॉन टेक्नॉलॉजी, ‘जॉन डियर’, ‘कमिन्स इंडिया’ आणि डीसी डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहनांची छोटी मॉडेल्स तयार करण्याची ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2015’ चे आयोजन करण्यात आले होते.
आज शनिवारी झालेल्या या पुणे ऑलिंपिकचे उद्घाटन झाले. यावेळी बी. व्ही. श्यामसुंदर (सरव्यवस्थापक, एआरएआय) डॉ. के. सी. व्होरा (उपाध्यक्ष, एसएई इंडिया), इटॉन कंपनीचे श्रीकुमार पनिक्कर, (एम्बेडेड सिस्टीमचे प्रमुख), संजय कुलकर्णी (व्यवस्थापक, व्हेईकल बिझनेस), जॉन डिअरचे प्रमोद पाटील (सरव्यवस्थापक जॉन डिअर), रिचर्ड व्रिलॅण्ड (संचालक कमिन्स), कमलाकानन राजगोपालन् (संचालक ईबीयू इंडिया), विनोद पटेल, दिलीप छाब्रिया (व्यवस्थापकीय संचालक डीसी डिझाइन), स्वप्ना केळकर (ऑर्किड स्कूलच्या प्रमुख), संगीत कपूर (ऑर्किड स्कूलच्या उपमुख्याध्यापक ) स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. 21 शाळांमधून 240 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले.
‘जेट टॉय’ निर्मिती स्पर्धेत 34 संघ सहभागी झाले. ‘स्किमर निर्मिती’ स्पर्धेत 26 संघ सहभागी झाले.
देशातील ऑटोमोबाईल अभियंत्यांची गरज वाढत असून, या क्षेत्रात कारकीर्द करण्याबद्दल जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील मूलतत्त्वे छोटी मॉडेल्स तयार करून शिकणे हा ‘अ वर्ल्ड इन मोशन’ या उपक्रमाचा उद्देश आहे. या स्पर्धांमधून देशाचे भावी ‘इंजिनीयर्स’ घडणार आहेत, असे बी. व्ही. श्यामसुंदर यांनी सांगितले.


