पुणे : महावितरणच्या कोथरूड विभाग अंतर्गत एसएनडीटी उपकेंद्ग ते बालभारतीपर्यंत 22 केव्ही भूमिगत वाहिनी एक व दोनच्या कामाचे भूमिपूजन मा. आ. सौ. मेधाताई कुलकर्णी यांच्याहस्ते नुकतेच झाले.
कोथरूड विभाग कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सौ. माधुरीताई सहस्त्रबुद्धे व श्री. अनिल राणे, अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर व श्री. सुभाष ढाकरे, कार्यकारी अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर उपस्थित होते.
सध्या एसएनडीटी उपकेंद्ग ते बालभारतीपर्यंत 22 केव्ही एक व दोन या उपरी वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. महावितरणच्या पायाभूत विकास आराखडा कार्यक्रम दोन अंतर्गत या दोन्ही वाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन श्री. उदय साठे यांनी केले तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. मुकुंद चौधरी यांनी आभार मानले.

