पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या भागात लागू झालेल्या एल. बी. टी. स पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने विरोध दर्शविला असून एल. बी. टी.च्या विरोधात बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी केला आहे.
पुणे कॅम्प मधील भोपळे चौकाजवळील राजस्थान भवनमध्ये पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने सर्व व्यापाऱ्यांची एल. बी. टी. बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीस दि फेडरेशन ऑफ ट्रेड असोंसिएशनस ऑफ पुणे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल , खजिनदार फतेचंद रांका , सचिव महेद्न पितळीया , पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनचे अध्यक्ष आनंद कोच्चर , उपाध्यक्ष पराग शहा , जयंत शेटे , अरविंद बुधानी , कावस पंडोल , किशोर संघवी , मनोज सेठी , संजीव फडतरे , विजय ओसवाल , महेंद्र चावला , गिरीश पटेल , अमित व्होरा , सागर शहा , राहुल काळे , मनेश मेहता , बोमन भरुचा , सुनील आठवानी , रोहन खंबाटा , प्रकाश ओसवाल , राहुल रांका व मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते .
यावेळी फतेचंद रांका यांनी सांगितले कि , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या भागात लागू झालेल्या एल. बी. टी. विरोधात सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शविला पाहिजे , देशात ६२ कॅंटोन्मेंट बोर्ड असताना फक्त पुणे कॅंटोन्मेंट बोर्डास एल. बी. टी. का लागू करण्यात येत आहे , त्यामध्ये केंद्र सरकार सत्तेवर येण्या अगोदर त्यांनी एल. बी. टी. रद्द करण्याचे सांगण्यात आले होते परंतु त्यांनी या एल. बी. टी. ची सुरुवात पुणे कॅंटोन्मेंट बोर्डापासून केली आहे , याला संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे . त्या साठी दि फेडरेशन ऑफ ट्रेड असोंसिएशनस ऑफ पुणे व पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर , स्थानिक खासदार अनिल शिरोळे , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , प्रकाश जावडेकर , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे . त्यामध्ये खासदार अनिल शिरोळे यांनी एल. बी. टी. रद्द करण्याचे आश्वासन व्यापारी बांधवाना दिले आहे . पुण्यामध्ये खडकी कॅंटोन्मेंट बोर्डास एल. बी. टी. लागू नाही तसेच देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड भागात आजही जकात घेण्यात येत आहे . त्यामुळे फक्त पुणे कॅंटोन्मेंट बोर्डास एल. बी. टी. का लागू करण्यात येत आहे. हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला . यासाठी व्यापारयानी एकजूटीने विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले . त्यामध्ये राज्यात १ ऑगस्ट पासून राज्य शासन एल. बी. टी. रद्द करणार आहे आणि केंद्र सरकारने पुणे कॅंटोन्मेंट बोर्डास एल. बी. टी. का लागू केली हि विसंगती व्यापाऱ्यांमध्ये शंका निर्माण करणारी आहे .
यावेळी पोपटलाल ओस्तवाल , पराग शहा , रतन किराड , जयंत शेटे, आनंद कोच्चर , अरविंद बुधानी , किशोर संघवी या व्यापारयानी मनोगते व्यक्त केली .