पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या भागात लागू झालेल्या एल. बी. टी.विरोधात पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने विरोध होता . एल. बी. टी.च्या विरोधात बंद आंदोलन व्यापाऱ्यांनी यशस्वी केला .
पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने सर्व व्यापाऱ्यांची एल. बी. टी. बाबत पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांना निवेदन दिले . दि फेडरेशन ऑफ ट्रेड असोंसिएशनस ऑफ पुणे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल , सुर्यकांत पाठक , सचिव महेद्न पितळीया , पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनचे अध्यक्ष आनंद कोच्चर , उपाध्यक्ष पराग शहा , जयंत शेटे , अरविंद बुधानी , कावस पंडोल , किशोर संघवी , मनोज सेठी , संजीव फडतरे , विजय ओसवाल , महेंद्र चावला , गिरीश पटेल , अमित व्होरा , सागर शहा , राहुल काळे , मनेश मेहता , बोमन भरुचा , सुनील आठवानी , रोहन खंबाटा , प्रकाश ओसवाल , राहुल रांका व मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते .
पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या भागात लागू झालेल्या एल. बी. टी. विरोधात सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शविन्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते . सायंकाळी भोपळे चौकातील राजस्थान भवन मध्ये सर्व व्यापारी बांधवांची बैठक पार पडली .

