Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘एक तारा ‘नंतर संतोष जुवेकरचा थरारक ‘बायकर्स अड्डा’ हि बनला यंदाचे आकर्षण

Date:

मोकळ्या रस्त्यावर वाऱ्याशी तुफान स्पर्धा..  बेफाम स्टन्टस.. थरारक रेसिंग्स आणि बाईकर्स. तारुण्याचा जोष आणि थरार दिसून येतो तो बाईकिंगमध्ये. बाईकिंग ही केवळ तारुण्यातली नशा न राहता करिअर म्हणूनही या क्षेत्राला वलय आलंय. हेवेदावे आणि स्पर्धा यात न अडकता स्पोर्टिंगली घेत निरनिराळे स्टन्ट करत आपले कौशल्य बाईकर्स आणि त्यांचे ग्रुप्स जगासमोर आणू लागलेत. बाईकिंगचे हेच वेड, त्यांच्यातले संघर्ष, येणाऱ्या अडचणी, एकमेकांवर केलेल्या कुरघोडी, शह-मातचा रोमांचकारी खेळ आपल्याला आगामी ‘बायकर्स अड्डा’मध्ये पहायला मिळणार आहे. श्री नवकर प्रस्तुत प्रमोद मारुती लोखंडे, विजय हरिया निर्मित, गणेश रमेश निबे सहनिर्मित आणि राजेश लाटकर लिखित-दिग्दर्शित ‘बायकर्स अड्डा’ हा चित्रपट येत्या १० एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्याआधी चित्रपटाची तरुणांमध्ये असलेली क्रेझ ओळखून ‘बायकर्स अड्डा’चा फर्स्ट लूक आणि गाण्यांची खास झलक नुकत्याच एका दिमाखदार सोहळ्यात दाखवण्यात आली. केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईकसाहेब यांच्या शुभहस्ते चित्रपटाच्या ध्वनिफितीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी श्री. अमर सिंह, सुप्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा, सुप्रसिद्ध संगीतकार श्री. आनंद राज आनंद, श्री. दिपकभाऊ निकाळजे, श्री. सुधीर गिरी आणि श्री, कुमार मंगत, मा. वंदना जैन तसेच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील असंख्य मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सुपर बाईकवर फुल ऑन स्टायलिश एन्ट्री घेत संतोष जुवेकरने उपस्थित रसिकांची वाहवा मिळवली. प्रार्थना बेहेरे आणि संतोष जुवेकरने दिलेला रोमांटीक परफ़ोर्मन्स, गायिका शाल्मली खोलगडेचे मधाळ स्वर आणि विशी-निमो यांच्या रॉकिंग म्युझिकच्या उत्साही वातावरणात उपस्थित सगळ्यांनीच ठेका धरला. ‘लेक्चर ग्यान’, ‘आला रे आला बाप्पा तू आला’, ‘ट्युन टू लव्ह’, ‘रिमझिम’, ‘वल्लाह वल्लाह’ अशी वेगवेळ्या मूडची गाणी ‘बायकर्स अड्डा’ मध्ये ऐकायला मिळतील. सत्यजित रानडे, प्रशांत हळवे, श्रेयस धर्माधिकारी आणि अमित जॉन यांनी ही गीते लिहिली आहेत तर जसराज जोशी, शाल्मली खोलगडे, श्रेयस धर्माधिकारी, प्रियांका बर्वे, शोना गोन्साल्विस आणि सिद्धांत भोसले यांनी ती गायली आहेत. म्युजिक लॉंचसोबतच ‘बायकर्स अड्डा’चा फर्स्ट लूकही यावेळी दाखवण्यात आला. ४ मित्र आणि त्यांचा बाईकिंगकडे असणारा ओढा या कथानकाभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. ‘बायकर्स अड्डा’मध्ये संतोष जुवेकर आणि प्रार्थना बेहेरेसोबत श्रीकांत मोघे, श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे हृषीकेश मांडके, जय आदित्य गिरी, अनिरुद्ध हरीप, देवेंद्र भगत आणि निखिल राजेशिर्के आदींच्या प्रमुख भूमिका पहायला मिळतील.
फ्रेश लूक आणि मन्सूर आझमी यांच्या वेगवान संकलनामुळे ‘बायकर्स अड्डा’चा ट्रेलर तरुणांना आकर्षित करतोय. मेहुल कपाडिया, जीत सिंग आणि संतोष पालवणकर यांनी चित्रपटातील गाणी कोरिओग्राफ केली आहे तर शकील खान यांच्या छायांकनाने ‘बायकर्स अड्डा’ चे सेट्स, लोकेशन्सना योग्य न्याय दिला आहे. कला दिग्दर्शन आणि कार्यकारी निर्मात्याची जबादारी अतुल तारकर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा – चैत्राली डोंगरे, साहसदृश्य – प्रशांत नाईक आणि मेकअप – किरण सावंत ही इतर श्रेयनामावली आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘शिर्डी के साईबाबा’सुधीर दळवींना उपचारासाठी शिर्डी संस्थानाची 11 लाखांची मदत

मुंबई- लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती...

एमआयटी एडीटी विद्यापीठ- फिलिप्स इंडिया यांच्यात सामंजस्य करार

पुणे: नावीन्य, संवर्धन आणि भावी लोकांसाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्यात...

4WD ट्रॅक्टर श्रेणीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टर सज्ज

·         शेती आणि मालवाहतुकीच्या वापरासाठी 20-70 अश्वशक्ती क्षमतेचे महिंद्राचे 4WD ट्रॅक्टर प्रचंड टिकाऊपणा आणि...