Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू

Date:

punya
पुणे

थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री शेकोटी पेटवून झोपलेल्या कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. नारायण पेठेतील कबीरबागेजवळ ही घटना घडली. मृतांमध्ये २२ वर्षांच्या एका तरुणीसह तिच्या आई-वडिलांचा समावेश आहे. गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय असून, पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

भगवान धोंडिबा घारे (५५), त्यांची पत्नी मंगला (५०) आणि मुलगी पौर्णिमा (२२) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. घारे यांचे कबीरबागेसमोर दुमजली घर आहे. घारे कुटु​बीयांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. घराच्या तळमजल्यावर त्यांचे वर्कशॉप आहे, तर वरच्या मजल्यावर ते राहतात. त्यांचा मुलगा धीरज हा भिवरा लॉजजवळील जुन्या घरी राहण्यास आहे. धीरज वर्कशॉपमध्ये आपल्या वडिलांना मदत करतो, अशी माहिती ‘परिमंडळ एक’चे उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दिली.

घारे यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. पहिल्या मजल्यावर बांधलेल्या खोल्या छोट्या आहेत. त्यात हे तिघे जण झोपले होते. झोपण्याच्या खोलीमध्ये कॉटखाली कोळसा पेटवलेली शेगडी ठेवण्यात आली होती. पोलिसांना घटनास्थळी ही शेगडी आढळली आहे. घारे यांच्या वर्कशॉपमधील कामगार सकाळी आठच्या दरम्यान आले, तेव्हा त्यांनी घारे यांना हाक मारली.

घरातून कोणतीही हालचाल झाली नाही, म्हणून त्यातील एका कामगाराने घराचा दरवाजा ठोठावला. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी धीरजला फोन केला. धीरजसुद्धा घरी आल्यानंतर दरवाजा ठोठावत होता; मात्र प्रतिसाद ​न मिळाल्याने तो वरच्या मजल्यावरील खिडकीतून घरात गेला. तेव्हा बेडरूमचे दार बंद होते. अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता तिघेही बेशुद्धावस्थेत आढळले. भगवान कॉटवर, तर मंगला आणि पौर्णिमा जमिनीवर अंथरुणावर झोपलेल्या होत्या.

पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा धूर कोंडला गेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. तिघांनाही जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच तांबडे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अक​स्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला, तरी सर्वच बाजूंनी या घटनेचा तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

‘जपानला जाण्याचे पौर्णिमाचे स्वप्नच राहिले’

या दुर्घटनेत मरण पावलेली पौर्णिमा ग्रॅज्युएट असून, ती जपानी भाषा शिकली आहे. ‘पौर्णिमाला जपानला जायचे होते. त्यासाठी तिने पासपोर्टकरिता अर्जही केला होता. पासपोर्ट आल्यानंतर ती लगेचच जपानला जाणार होती. परंतु ते तिचे स्वप्नच राहिले,’ अशी भावना त्यांचे शेजारी सचिन गरूड यांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...