महावितरणची विशेष मोहिमेतील कारवाई
पुणे, दि. 03 : महावितरणच्या मुळशी विभागअंतर्गत वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत 89 ठिकाणी 3 लाख 46 हजार युनिटची म्हणजे 29 लाख 91 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली आहे.
मुळशी विभाग अंतर्गत हडपसर ग्रामीण, उरुळीकांचन, लोणी काळभोर, कुंजिरवाडी, वाघोली, लोणीकंद, इनामदारवस्ती, मांजरी आदी परिसरातील 351 घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजमीटरची मंगळवारी (दि. 1) तपासणी करण्यात आली. यासाठी 72 अभियंता, जनमित्र यांची 13 पथके तयार करण्यात आली होती.
वीजमीटरच्या तपासणीत हडपसर ग्रामीण उपविभागात 53 ठिकाणी 12 लाख 91 हजार रुपयांची तर उरुळीकांचन उपविभागात 36 ठिकाणी 17 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. या सर्व वीजचोरीप्रकरणी संबंधीतांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार, उपकार्यकारी अभियंता श्री. कल्याण गिरी, श्री. राजेंद्ग भुजबळ यांच्यासह अभियंते व जनमित्र यांनी वीजचोरीविरोधी मोहिम राबविली.


