पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी संध्या या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात अंध व अनाथांनी सहभागी होऊन दिवाळीचा आनंद लुटला.
पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने कै .वसंतराव बागुल उद्यानात या दिवाळी संध्या २0१४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंध व अनाथ बांधवांना फराळाचे वाटप केले. तसेच सर्वांनी फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला. त्यांच्या आनंदात भर पडण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
यावेळी अंध व अनाथांनी आपल्यातील कला सादर केल्या व आनंदी आनंद झाला गाणे गाऊन आपला आनंद व्यक्त केला. समाजामध्ये सर्वच जण दिवाळी साजरी करतात. परंतु, अंध व अनाथ बांधव या सणापासून वंचित राहतात. गेले १५ वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
फराळाचे वाटप, फटाक्यांची आतषबाजी, सांस्कृतिक कार्यक्रमाव्दारे त्यांचा आनंद व्दिगुणीत करण्याचा छोटासा प्रय▪आम्ही दरवर्षी करत असतो, असे शेवटी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले.
याप्रसंगी पुणे असोसिएशन मधील सर्व अंध बंधू-भगिनी त्याचप्रमाणे जनसेवा फाउंडेशन संस्थेमधील सर्व अनाथ विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी अमित बागुल, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, सागर आटोळे, राजेंद्र बडगे उपस्थित होते.