पुणे- प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक ईश्वरदास चोरडिया यांचे पुत्र अजय चोरडिया यांनी चिंचवड येथील एका हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, सोमवारी घडली. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अजय चोरडिया हे पंचशील हॉटेलचे चेअरमन होते.
घटनेची माहिती मिळताच चोरडिया यांना चिंचवडमधील निरामय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजले नाही.