उद्यम विकास सहकारी बँकेच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन संपन्न
बँकेने छोट्या व्यावसायिकांना ही कर्ज द्यावे-ना.गिरीश बापट यांची सूचना.
उद्यम बँकेच्या संचालाकांमुळे ही बँक आपली असल्याची कोथरूड करांची भावना-.शशिकांत सुतार.
केंद्र सरकारच्या विविध योजना राबविणाऱ्या उद्यम बँकेचे कार्य कौतुकास्पद-आ.मेधा कुलकर्णी.
पुणे-
उद्यम विकास सहकारी बँकेच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन पौड रोड,कोथरूड येथे ना.गिरीश बापट यांच्या हस्ते पार पडले.यावेळी आ.प्रा.मेधा कुलकर्णी,मा.शशिकांत भाऊ सुतार,जिल्हा उपनिबंधक धरणीधर पाटील इ.मान्यवर उपस्थित होते.
उद्यम बेंकेचे संचालक हे नितीमत्ता पाळतात,ते नातेवाईकांना कर्ज देत नाहीत,वाहन भत्ता किंवा इतर मानधन घेत नाहीत,यामुळेच ही बँक भरभराटीला आली असून या बँकेचा उत्कर्ष होईल व त्यासाठी लागणारी सर्व मदत आपण करू असे उद्घाटक अन्न नागरी पुरवठा व संसदीय कार्य मंत्री .गिरीश बापट म्हणाले,बँकेने छोट्या व्यावसायिकांना ही कर्ज द्यावीत,अगदी दोन हजार,पाच हजार इतकी छोटी रक्कम मागणारे ही छोटे छोटे व्यावसायिक असून सहकारी बँकांनी त्यांना आधार दिला पाहिजे असे ही पालक मंत्र्यांनी स्पष्ट केले.मा.शशिकांत सुतार यांनी संचालक मंडळाचे कौतुक करताना सांगितले कि हे सर्व्संचालक सर्वसामान्यान कुटुंबातून आले असून कोथरूड भागात तळा गाळात काम करणारे कार्यकर्ते असून त्यांच्या माध्यमातून या परिसरात उद्यम बँकेच्या शाखेचे उद्घाटन होत आहे ही आनंदाची बाब असून या भागात जुन्या काळात एकाच सोनाराचे दुकान होते ,मात्र आज कोथरूड परिसर व्यवसायाचे केंद्र बनले आहे,त्याचाच एक भाग म्हणून येथे अनेक सहकारी बँक झाल्या असल्या तरी उद्यम बँकेचे संचालक स्थानिक असल्याने कोथरूड कर त्यांना स्वीकारतील व बँक निश्चित प्रगती करेल.
आ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या “सचोटीने कारभार करून उद्यम बँकेने नावलौकिक मिळविले आहे,सहाव्या शाखेच्या उद्घाटना च्या माध्यमातून पंतप्रधान विमा योजना व अन्य शासकीय योजना ही सामान्य माणसा पर्यंत पोचविण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे.त्यास माझे सर्वतोपरी सहकार्य असेल,”
बँकेचे अध्यक्ष दिलीप उंबरकर यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडताना झीरो एन.पी.ए.असल्याचा उल्लेख केला व शून्य थकबाकी साठी बँकेस अनेक पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.तसेच बँकेस रिजर्व बँकेकडून सातत्याने अ दर्जा मिळाला असून आमच्या संचालक मंडळाने ३२ कोटी वरून बँकेचे ठेवी ८५ कोटी पर्यंत नेल्या असून पुढील कालावधीत १०० कोटी चे उद्दिष्ट्य पूर्ण करू असे ही ते म्हणाले.
प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप उंबरकर यांनी केले,कार्यकारी संचालक निरंजन फडके यांनी स्वागत,उपाध्यक्ष पी.के.कुलकर्णी यांनी आभार मानले.बँकेचे संचालक संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन केले.या वेळी कोथरूड परिसरातील विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.