नवी दिल्ली- बुधवारपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे त्यामुळे ऊ त्तराखंडमधील केदारनाथ यंदा पुन्हा जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली आहे.गंगेच्या उपनद्या कोपल्या आहेत. केदारानाथमध्ये सुमार 15 हजार यात्रेकरू अडकल्याचे वृत्त आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एनडीआरएफ) जवानांनी नऊ हजार यात्रेकरुंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुढील 72 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर केदारनाथ यात्रा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आल्याची घोषणा येथील सरकारने केली आहे
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे राज्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. यात्रेकरुन हिम्मत सोडू नये, प्रशासनातर्फे यात्रेकरूंना मदत केली जाणार आहे. दुसरीकडे, कैलास मानसरोवर यात्रेचा चौथा जत्था धारचूला बेस कॅम्पमध्ये रोखण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हेमकुंड साहिब आणि बद्रीनाथ भागातील 12 पेक्षाजास्त रस्ते आणि अनेक पूल वाहून गेले आहेत.
सोनप्रयाग जवळील पूल आणि रस्ता पुरात वाहून गेल्याने भाविकांना शुक्रवारी पुढे जाता आले नाही. त्याचप्रमाणे रुद्रप्रयाग जवळील एका पुलाची दुरुस्ती केली जात आहे. केबल कारच्या मदतीने अनेक यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जात आहे.एनडीआरएफच्या पथकाने 14 हेलिकॉप्टरच्या मदतीने शुक्रवारी 900 यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह केदारनाथ येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांकडून क्षणाक्षणाला माहिती जाणून घेत आहेत.
उत्तराखंडमधील जवळपास सर्वच नद्यांना महापूर आला आहे. मुसळधार पावसामुळे गढवाल आणि कुमाऊंच्या सर्व नद्या दुथडी भरून वाहात आहेत. गढवालमध्ये अलकनंदा, मंदाकिनी आणि भागीरथीच्या जलपातळीत वाढ झाली आहे. ऋषिकेश व हरिद्वारमध्ये गंगेची जलपातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. प्रशासनतर्फे हायअलर्ट जारी केला आहे.दुसरीकडे, कुमाऊंमध्ये शारदा, सरयू, गोमती आणि काली नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पिथौरागढ जिल्ह्यात काली नदीचे पाणी एका गावात शिरल्याने 40 कुटुंबांना बेघर व्हावे लागले आहे.
मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रेत मोठा अडथळा आला आला आहे. पिठोरागड जिल्ह्यातील दोभाट कालापानी मार्गावर दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे यात्रेकरूंची तिसरी चौथी तुकडी रोखून धरण्यात आली आहे. या तुकड्या अनुक्रमे गुंजी धारचुला येथे थांबवण्यात आल्या आहेत. तथापि, सर्व प्रवासी सुरक्षित आहे