पुणे–
उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीकरिता पुणे बार असोसिएशन व पुण्यातील वकील बांधव , नागरिकांनी सोमवार पेठ मधील नरपतगीर चौकात आंदोलन केले . यावेळी वकील बांधव आणि नागरिकांनी खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीचे फलक हातात धरले होते . या आंदोलनात जेष्ठ विधीज्ञ नंदू फडके , पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश शेडगे , योगेश पवार , सतीश पैलवान , मिहिर तथ्थे , नितीन परतानी , बाळासाहेब बरके , राजेंद्र तांबे , फैय्याज शेख , शाहीद अत्तार , अश्विनी गवारे , अशोक संकपाळ , रमेश धर्मावत ,रोहित माळी , साहेबराव जाधव , बाळासाहेब घोडके , शब्बीर खान , राहुल झेंडे , समीर शेख , दत्तात्रय थोपटे , रवि शिंदे , प्रमोद जोशी आदी वकील बांधव सहभागी झाले होते .
यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश शेडगे यांनी सांगितले कि , पुण्यात खंडपीठ व्हावे गेले अनेक वर्षापासूनची मागणी पुण्यातील वकील बांधव करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौरा पूर्ण करून आल्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत ठराव करून खंडपीठाची मागणी पूर्ण करू असे आश्वासन दिले होते . परंतु आश्वासन पूर्ण न केल्याने वकील बांधव पुणे शहरात विविध ठिकाणी आंदोलन करीत आहे .