पुणे-
उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्यावतीने शिवाजीनगर मधील कामगार पुतळा चौकाजवळ आंदोलन करून मागणी केली .
आज सकाळपासूनच वकील बांधव आपल्या मागण्या पूर्ण होण्याकरिता आंदोलनात सहभागी झाले होते . यामध्ये शिवाजीनगर धान्य गोदामाची जागा न्यायालयास तात्काळ हस्तांतरित करणेसाठी , उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे मिळण्यासाठी , न्यायालय परिसरातील पायाभूत सुविधा मिळण्यासाठी आदी मागण्या पूर्ण करण्याकरिता आंदोलन घेण्यात आले होते .
यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अड. विकास ढगे पाटील यांनी सांगितले कि , सन १९७८ मध्ये विधिमंडळात उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्याचा ठराव समंत करण्यात आला आहे तरी देखील या ठरावाची अंमलबजावणी अद्याप होत नाही . शिवाजीनगर धान्य गोदामाची जागेची मागणी अनेक दिवसापासून करण्यात येत आहे . वाहनतळाची समस्या , न्यायालयातील बार मधील वकिलांना बसण्यास जागा नाही , पक्षकारांना वेटिंग रूम नाही , नागरिकासाठी नागरी सुविधा नाहीत , पुरेशी स्वछता देखील नाही . या सर्व मागण्या पूर्ण होण्याकरिता पुणे बार असोसिएशनच्यावतीने उपोषण , धरणे आंदोलन , रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे .
यावेळी पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अड. सतीश पैलवान यांनी सांगितले कि , २२ मार्च १९७८ रोजी तत्कालीन आमदार राम कांडगे यांनी विधिमंडळात उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्याचा प्रस्ताव मांडला होता . या प्रस्तावचा ठराव शरद पवार यांनी समंत केला होता . त्यावेळी कॅबिनेटचे पत्र मुख्य न्यायाधीश यांच्या कडे गेले होते . परंतु अद्याप या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही . पुण्यात शासनाचे अनेक विभागीय कार्यालये आहेत , तसेच आय. टी. हब देखील आहेत उणे शहर मेट्रो सिटी होत आहे , त्यामुळे उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात लवकरात लवकर करण्यात यावे अशी अनेक दिवसापासुनची मागणी आहे . राज्यातील नवीन सरकारकडून हि मागणी पूर्ण होईल .
शिवाजीनगर धान्य गोदामाची नऊ एकर जागा मिळाल्यास न्यायालयाचे अनेक प्रश्न सुटतील . न्यायालयात पायाभूत सुविधा मिळतील . पुण्याची वाढती लोकसंख्या पाहता , तसेच पक्षकारांना होणारा मनस्ताप कमी करण्याकरिता आपल्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात असे काही वकिलानी सांगितले . जसवंत सिंग कमिटीचा अभ्यास करून आपण आपली मागणी पुढे रेटू शकतात , बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अड. हर्षद निंबाळकर आणि अड.सुरेशचंद्र भोसले यांनी उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पाठपुरावा केला आहे .
या आंदोलनात पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अड. विकास ढगे पाटील, उपाध्यक्ष अड. सतीश पैलवान ,अड.संतोष खामकर , सचिव अड. सचिन हिंगणेकर , अड. विश्वजित पाटील , अड. मिलिंद पवार , अड. बिपीन पाटोळे , अड. सागर नेवसे , अड. राहुल बोराडे , अड. इब्राहीम शेख , अड. अहमद खान उस्मान खान पठाण , अड. दादासाहेब बेंद्रे , अड. निवेदिता काळे , अड. अतिश लांडगे , अड. लक्ष्मण घाडगे पाटील , अड. राजेंद्र उमाप , अड. शिरीष शिंदे , अड. औदुंबर खुणे पाटील , अड. धनंजय तौर , अड. आशिष ताम्हाणे , अड. के. टी. आरु , अड. मोनिका वाडकर , अड. राणी सोनावणे , अड. अमोल जाधव , अड. लक्ष्मण राणे , अड. अमोल काजळे पाटील , अड. पल्लवी व्हावळ , अड. अतुल गुंजाळ , अड. मंगेश लेंडघर , अड. संजीवनी केंजळे , अड. विश्वजित पाटील , अड. सुरेश देवकर , अड. बी. ए. अल्लूर , अड. राजश्री कोल्हापुरे , अड. अतुल गुंड पाटील , अड. दत्तात्रय गायकवाड , अड. वाजेद खान व मोठ्या संख्येने वकील बांधव सहभागी झाले