‘ई-वेस्ट मॅनेजमेंट’मधील योगदानाबद्दल संजय भंडारी यांचा गौरव
पुणे :
इलेक्ट्रॉनिक वस्तु, संगणक क्षेत्रातील ‘ई-वेस्ट मॅनेजमेंट’ संकल्पना राबवून 15 वर्षे योगदान दिल्याबद्दल ‘आनंद कॉम्प्युटर सिस्टिम्स्’चे संचालक संजय भंडारी यांचा गौरव करण्यात आला. ‘कॉम्प्युटर्स अॅण्ड मीडिया डिलर्स असोसिएशन’च्या वतीने ‘आनंद कॉम्प्युटर्स’ला ‘बेस्ट पॅव्हिलियन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
पंडित फार्म येथे आयोजित ‘आय.टी. एक्स्पो’ चे उद्घाटन फतेचंद रांका यांच्या हस्ते करण्यात आले होते.
संजय भंडारी यांनी ‘रिड्युस-रियुज-रिसायकल’ ही प्रणाली उपयोगात आणून शासन मान्य मार्गदर्शन तत्त्वानुसार ‘ई-वेस्ट मॅनेजमेंट’चे काम प्रभावीपणे केले.
25000 हजार नागरिकांनी ‘आय.टी. एक्स्पो’ प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनामध्ये 100 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. हे प्रदर्शन ‘आय टी फॉर स्मार्ट सिटी’ या संकल्पनेवर आधारित होते. तसेच माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, सुरक्षा यातील नवीन तंत्रज्ञानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख हेतू होता.