ईदच्या शुभेच्छा देणार्या ‘दिल की बात’ गझल कार्यक्रमासोबत शीरखुर्मा-पुरणपोळीचा स्वाद!
पुणे :
पुण्याच्या सर्वधर्मीय, सर्वपक्षीय, सर्व स्तरीय सामंजस्याचे प्रतिक मानल्या जाणार्या ‘आझम कॅम्पस’ मधील ‘ईद मिलन’ कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या ईद मिलन कार्यक्रमात ‘दिल की बात’ या गझल कार्यक्रमासोबत शीरखुर्मा आणि पुरणपोळीचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. सर्वधर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शुक्र्रवारी सायंकाळी आझम कॅम्पस परिवारातील ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’, ‘हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’, ‘गोल्डन ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट’ आणि ‘डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट’ या संस्थांनी ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी स्वागत केले.
‘साज पुणे’ या ग्रुपचा ‘दिल की बात’ हा गझल रंग कार्यक्रम शशीकला शिरगोपीकर, गायत्री सप्रे-ढवळे, श्रृती करंदीकर, नीरजा आपटे यांनी सादर केला. त्याला चांगली दाद मिळाली.
माजी खासदार सुरेश कलमाडी, सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई, बिशप थॉमस डाबरे, मोहिंदरसिंह कंधारी, डॉ. एस.एन.पठाण, अशोक धिवरे, पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. सतीश देसाई, अॅड. अभय छाजेड, समाजवादी नेते मधुकर निरफ राके, रवींद्र माळवदकर, कमल व्यवहारे, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, प्रशांत जगताप, नगरसेविका नंदा लोणकर, सुनंदा गडाळे, खडकी कॅण्टोन्मेंट उपाध्यक्ष सुरेश कांबळे, भाईजान काझी, पुरुषोत्तम वाडेकर, रवींद्र सुर्वे, संदीप बर्वे, सुनील मगर, पोलीस अधिकारी बरकत मुजावर, संजय गायकवाड, डॉ. परवेझ इनामदार उपस्थित होते.
पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार, मुन्नवर पीरभॉय, लतिफ मगदूम, डॉ. एन. वाय. काझी, वाहिद बियाबानी यांनी स्वागत केले.