पुणे- इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन अर्थात इम्पा या संघटनेवर टी. पी आगरवाल यांनी आपले वर्चस्व अबाधितपणे कायम राखले आहे . ख्यातनाम निर्माते के . सी बोकाडिया यांच्या गटाचा त्यांनी धुव्वा उडवीत १९ जागा जिंकल्या तर अवघ्या ४ जागांवर बोकाडिया गटाला आपले स्थान राखता आले . त्यांच्या गटातील महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर या २ मातब्बर मराठी निर्माते आणि अभिनेत्यांना आपली छोट्या आणि मोठ्या पडद्यावरची झप्पी येथे उपयोगी ठरली नाही या दोघांचा येथे पराभव झाला . तर आगरवाल गटातील विजय पाटकर या अभिनेता असलेल्या आणि मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांना हि पराभव चाखावा लागला .
कॉंग्रेस(आय) पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष असलेले , पुण्यातील निर्माते विकास पाटील हे आगरवाल गटातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत , ‘भिंगरी ‘ अभिनेत्री -निर्माती सुषमा शिरोमणी आणि बाळासाहेब गोरे हे देखील विजयी झाले . पराभूताममध्ये केतन देसाई , कुकू कोहली , विजय कुमार सिंह यांचा समावेश आहे
निकाल पुढीलप्रमाणे –
मेन प्राईम विभाग –
विजयी उमेदवार
विकास पाटील , टी. पी आगरवाल , अभय सिन्हा, मनोज चतुर्वेदी , बाळासाहेब गोरे , बॉबी बेदी , विनोद छाब्रा , जे नीलम , अशोक पंडित,निशांत उज्वल, जयप्रकाश शा, जितेन पुरोहित,हरेश पटेल, नितीन मावाणी, राजू भट्ट ,रमेश मीर
असोसिएट विभाग –
विजयी उमेदवार-
सुषमा शिरोमणी , के सी बोकाडिया, , मेहुल कुमार , रिकू राकेशनाथ , महेंद्र धारिवाल
टी.व्ही विभाग –
विजयी उमेदवार-
बाबुभाई थिबा , राहुल आगरवाल