“इंटरनॅशनल पार्लमेंटरी फोरम’च्या “नवीनीकरणीय उर्जा’ चर्चासत्रात खासदार वंदना चव्हाण यांचा सहभाग
पुणे :
“इंटरनॅशनल पार्लमेंटरी फोरम ‘आयोजित “नवीनीकरणीय उर्जा’ या लुक्रेन स्विर्त्झर्लंड येथील चर्चासत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादी पुणे शहर अध्यक्ष ऍड. वंदना चव्हाण सहभागी झाल्या आहेत. जगभरात “नवीनीकरणीय ऊर्जा’ (रिन्युएबल एनर्जी) वापर वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सरकारांना एकत्रित कोणते प्रयत्न करता येतील, या बद्दल या परिषदेत उहापोह होत आहे.
“भारत’, “युरोप’, “आफ्रिका’, “चीन’, “पाकिस्तान’, “मध्य पूर्व, बांग्लादेश’ अशा एकूण वीस देशांतून संसद सदस्य सहभागी झाले आहे. भारतातून डॉ. संजय जयस्वाल, ऍड. वंदना चव्हाण, ए. यू. सिंग, आनंद भास्कर कोपलू, उपेंद्र त्रिपाठी (केंद्रीय सचिव) सहभागी झाले आहेत.
12 आणि 13 जून रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.