पुणे- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार विनायक निम्हण यांनी
रविवारी सुटीची वेळ साधत संपूर्ण दिवसभर मतदारांशी संपर्क साधला. सकाळ व दुपारच्या
टप्यात वडारवाडी भागातील सर्व मंडळांच्या व सोसायट्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व
कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी साधला तसेच मतदारांच्याही गाठीभेटी घेतल्या. तत्पूर्वी सकाळी
खडकी येथील सेंट अँड्रयूज चर्चमध्ये जावून निम्हण यांनी तेथील फादर यांचे आशीर्वाद
घेतले. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या नागरिकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली.
विनायक निम्हण यांनी वैयक्तिक गाठीभेटी व संपर्कावर भर दिला आहे. त्यामाध्यमातून
त्यांनी रविवारी संपूर्ण वडारवाडी, पीएमसी कॉलनी, वडारवाडी मारुती मंदिर, बाबा हॉस्पिटल,३९१
सोसायटी, ८८३ झोपडपट्टी, बुद्धविहार पांडवनगर, हा सर्व परिसर पिंजून काढला.त्यांनी या
भागातील् सार्व गणेश व नवरात्रौ मंडळांना भेटी दिल्या. त्यांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या
आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. वडार समाज संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी
संपर्क साधत त्यांच्या, अडीअडचणी समजून घेतल्या नागरिकांनाही त्यांनी मतदान करण्याचे
आवाहन केले. त्यांच्यासमवेत नगरसेवक मुकारी अलगुडे,खडकी कँटॉंन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष
मनिष आनंद, बंडू चव्हाण, पुणे शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास पवार,रिझवान
शेख,गोविंद रणपिसे,काळू कुसाळकर, विजय विटकर, नारायण पाटोळे,विनायक विरकुड, चरण
डोंगरे,आनंद शिंदे,रामदास पवार, दत्तू कुसाळकर,भारत पवार,श्रावण मंगळवेढेकर, क्रांतीवीर
लहूजी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वैराळ,सुरेश जाधव, दयानंद इरकर,दशरथ क्षेत्री, कैलास
मंजाळकर आदी कार्यकर्ते संपर्क मोहिमेत सामिल झाले होते. त्यांनी विनायक निम्हण यांना
प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार केला.