जोधपूर- अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू हे सध्या जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात आहेत. आसाराम यांना गुरुवारी (16 ऑक्टोबर) कोर्टात सुनावणीसाठी आणले असता त्यांच्या अनुयायींनी एकच गर्दी केली. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षारक्षकांना मोठी कसरत करावी लागली.
आसाराम यांचा चेहरा पाहाण्यासाठी लोक सकाळपासून कोर्ट परिसरात उपस्थित होते. आसाराम यांना मोठ्या पोलिस बंदोबस्तात कोर्टात आणण्यात आले. अनुयायींनी हात जोडून आसाराम यांचा आशीर्वाद घेतला. आसाराम हे देखील हात उंचावून अनुयायींना आशीर्वाद देताना दिसले.