आय.एम.ई.डी. मध्ये ‘व्यवस्थापनातील अकौटिंग, ऑडिटिंग’ विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला चांगला प्रतिसाद
पुणे:
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आय.एम.ई.डी.) च्या वतीने ‘सार्क ग्रुप ऑफ नेशन’ मधील व्यवस्थापन अभ्यासक्रमातील ‘अकाऊंटींग, ऑडिटींग, गव्हर्नन्स अॅण्ड कन्टेपरी इश्यू इन मॅनेजमेंट’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
ही परिषद गुरुवारी आयएमईडी, एरंडवणे, पौड रोड येथे झाली असून, या परिषदेला एम.बी.ए., एम.सी.ए. च्या अभ्यासक्रमाचा प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. ‘व्यवस्थापनशास्त्र शाखेचे’ अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले.
प्रा. डॉ. महेश जोशी (आर.एम.आय.टी. विद्यापीठ, मेलबर्न) यांनी बीजभाषण केले. ‘संशोधकांनी आपल्या अभ्यास विषयात लेखन चांगल्या जर्नल्स्मध्ये प्रसिद्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न करावेत’, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले. संशोधनातील संधींवर डॉ.जी.एस.बात्रा यांनी मार्गदर्शन केले. डॉ. वेंकट सुब्रमण्यम यांनी ही मार्गदर्शन केले. डॉ. किर्ती गुप्ता यांनी आभार मानले.