पुणे :
भारती विद्यापिठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) तर्फे ‘आय.एम.ई.डी. गेम्स्’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आय एम ई डी’ एरंडवणे कॅम्पसमध्ये पार पडलेल्या या महोत्सवाचे उदघाटन डॉ.सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ व्यवस्थापन शास्त्रशाखेचे अधिष्ठाता आणि ‘आय एम ई डी’चे संचालक) यांनी केले.
रणप्रीत कौर, प्रमोद कदम, शिवाली इंगवले यांनी या स्पर्धा महोत्सवाचे संयोजन केले होते. डॉ. हेमंत अभ्यंकर (अॅकॅडमी आयएमईडी चे अधिष्ठाता), डॉ.भारतभूषण संख्याय (स्टुडंट, वेलफेअरचे अधिष्ठाता), डॉ. अजित मोरे, प्रा. डॉ.अशोक रानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयातील 400 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धा महोत्सवात वक्तृत्व, माय पिक्चर स्टोरी, अॅड मॅड शो, फ्लेम लेस पाककला, मुक्त सर्जनशीलता, संकेतस्थळ निर्मिती, तंत्र स्पर्धा, खजिना शोधाशोध इत्यादी स्पर्धांचा समावेश होता.