मॉडेल, अभिनेत्री आणि गायिका असे गुण सर्व गुण संपन्न असणाऱ्या रेणू चौधरी यांचा ‘आय एम इन लव’ हा गीतांचा नविन अल्बम लवकरच बाजारात दाखल होणार आहे. असे रेणू चौधरी यांनी सांगितले. आर. आर. आर प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या अल्बममध्ये एकूण सहा गीते असून या गीतांना संगीत आणि गायन देखील रेणू चौधारो यांचे आहे. यात प्रेम गीत, विरह गीत आणि नृत्याला हि प्राधान्य दिले आहे.
लहानपणापासूनच रेणू चौधरी यांना गायनाची आवड असल्याने त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून गायिकी सुरु केली सुरवातीला त्यांनी भक्ती गीतांना प्राधान्य देत ती गीते गायली. त्यांनंतर टेलिव्हिजन वरती काही शो केले आणि आता स्वतःच्याच अल्बमसाठी गायन करत आहेत. आगामी काळात चित्रपटांसाठी गायन करणार असल्याचे रेणू यांनी सांगितले.
रेणू म्हणाल्या, कि हिंदी गीतांबरोबर मला अन्य भाषेतील गीते गायाला आवडतील. त्यात प्रामुख्याने मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली गीते मला गायाला आवडतात. या गीतांवर मी जमेल तसा रियाज पण करत असते. काही विविध भाषेतील चित्रपटांच्या गायनासाठी माझ्याशी बोलणे देखील झाले आहे. लवकरच मी आपणाला मी अन्य भाषेत गायन करताना दिसेल. माझ्या येणाऱ्या ‘आय एम इन लव’ अल्बम कडून खूप अपेक्षा आहेत. रसिकांनी मला भरभरून साथ द्यावी असे हि रेणुकाने तिच्या मनातील इच्छा व्यक्त करून दाखवली.