आयुष काटे ‘कला की खोज ‘ नृत्य गायन स्पर्धेत वरिष्ठ गटात विजयी
पुणे :
‘कला की खोज ‘ २०१५ या नृत्य -गायन स्पर्धेत बिशप स्कूल कल्याणीनगर चा विद्यार्थी आयुष काटे हा वरिष्ठ गटात अंतिम फेरीत विजयी ठरला .एन्त्रू नस ‘ आयोजित ही स्पर्धा फिनिक्स मार्केट सिटी येथे झाली . अभिनेता टॉम आल्टर ,फलेन नेटो (झलक दिखला जा ),युवान माकर (कलाकार ) रितिका इराणी (कोरियो ग्राफर) ,शीतल कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले .
या परीक्षकांच्या हस्ते आयुष काटे याला पारितोषिक देण्यात आले . आयुष हा बिशप स्कूल चा विद्यार्थी आहे . बिशप स्कूल आणि पालक डॉ दिपाली राजेश काटे यांनी आयुष चे अभिनंदन केले . या स्पर्धेत २५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते