पुणे :
कल्याणीनगर येथील ‘बिशप स्कूल’चा दहावीतील विद्यार्थी आयुष राजेश काटे याने दिल्लीतील ‘इंद्रधनुष्य नॅशनल चिल्ड्रन्स डान्स फेस्टिव्हल’मध्ये नृत्य स्पर्धेत विशेष प्राविण्य पारितोषिक तर ‘फ्री स्टाईल नृत्य प्रकारात उपविजेतेपद मिळाले. ‘सोसायटी फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ नॅशनल आर्ट्स ऑफ इंडिया’ (नवी दिल्ली) या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती.
तसेच गोवा येथे झालेल्या ‘इंडियन आर्ट अॅण्ड कल्चर सोसायटी’, गोवाच्या वतीने आयोजित ‘कल्चरल कार्निव्हल 2015’ या कार्यक्रमात ‘बेस्ट ड्युएट परफॉर्मन्स’ पारितोषिक मिळाले. शिवाली शितोळे या साथीदारासोबत आयुष काटे याने नृत्याचे सादरीकरण केले होते.
बिशप स्कूलचे मुख्याध्यापक फर्दीनंद बुनियान यांनी आयुष राजेश काटे याचे या यशाबद्दल अभिनंदन केले.


