मुंबई: आयडीबीआय बँकेने दोन रेपो लिंक्ड उत्पादने दाखल केली आहेत – सुविधा प्लस होम लोन व सुविधा प्लस ऑटो लोन. ही उत्पादने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) रेपो रेटला अनुसरून असतील आणि ग्राहकांना 10 सप्टेंबर 2019 पासून उपलब्ध होतील.
चांगला क्रेडिट स्कोअर व वार्षिक किमान 6 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना सुविधा प्लस होम लोन वसुविधा प्लस ऑटो लोन ही उत्पादने दिली जातील.
सुविधा प्लस होम लोन 35 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 75 लाख रुपयांपर्यंत दिले जाईल. बँक नव्या प्रकाराअंतर्गत,प्रक्रिया शुल्क न आकारता, टॉप-अप सुविधेद्वारे बॅलन्स ट्रान्स्फर करणार आहे. सध्या, होम लोनवरील व्याजदर वार्षिक 8.30% पासून असेल.
ऑन रोड प्राइस समाविष्ट करत, 7 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 25 लाख रुपयांपर्यंत सुविधा प्लस ऑटो लोन दिले जाणार आहे. विशेषतः नव्या 4 व्हीलरसाठी कर्जे दिली जाणार आहेत. सध्या, ऑटोन लोनवरील व्याजदर वार्षिक8.90% पासून असेल.
हरित उपक्रमाला उत्तेजन देण्यासाठी, सुविधा प्लस ऑटो लोन अंतर्गत इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी अतिरिक्त 10 बेसिस पॉइंटची सवलत दिली जाईल.
यानिमित्त बोलताना, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा यांनी सांगितले, “आमचे रिटेल श्रेणीतील लोन बुक वार्षिक 19% वाढत आहे आणि या उत्पादनांमुळे या श्रेणीतील व्यवसाय वाढवण्यासाठी आम्हाला मदत होणार आहे.”