पुणे :
‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव ‘एक्सप्रेशन 2015’ ची सांगता नुकतीच झाली. महोत्सवातील स्पर्धांमध्ये 45 महाविद्यालयातील 150 संघातून एकूण 1800 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते ‘एक्सप्रेशन 2015’ महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
यावेळी प्रा.अनिल केसकर (अॅकॅडमिक्स सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाचे अधिष्ठाता) , सौ.केसकर, डॉ.ए.एम.गुरव (व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता, शिवाजी विद्यापीठ) आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवाचे उद्घाटन ‘सायबर सेल’चे पुणे पोलिस उपायुक्त डॉ. संजय शिंदे आणि प्रकाश लिमये यांनी केले होेते. महोत्सवाला हेमंत अभ्यंकर, डॉ. भारत भूषण संकाय, माजी पोलीस अधिकारी प्रकाश लिमये, प्रभात कुमार, बलजित, श्री. महादे उपस्थित होेते.
महोत्सवाचे तांत्रिक, व्यवस्थापन, ललित कला आणि सादरीकरण या चार विभागात विभाजन करण्यात आले होते . या महोत्सवाला पी.एन.जी., पुणे फुटबॉल क्लब, बिग बझार, मदर्स रेसीपी, बँक ऑफ महाराष्ट्र, 1960 रेस्टॉरंट, डायनॅमिक्स पार्लर यांचे सहकार्य लाभले होते.
डॉ. शिंदे यांनी पहिल्या दिवसाच्या सत्रात राष्ट्रीय मालमत्ता, पायाभूत सुविधांचे ‘सायबर वॉर’मुळे नुकसान होत असेल, तर त्यापासून देशाला वाचविणे कसे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सचिन वेर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्र संस्थांनी ग्रामीण भागात, अविकसित भागात उद्योजकता वाढवून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले.
या महोत्सवात सांस्कृतिक स्पर्धा, पोस्टर मेकिंग, फॅशन शो, फेस पेंटींग, रांगोळी, मेहंदी, अॅड मॅड शो असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
महोत्सवाचे विनय थापलिया, छबी, अरूणवा दत्ता, नेहा जसपाल, केतन यांनी संयोजन केले.