मुंबई- सरकार स्थापनेसाठी माझ्याकडे अद्याप कोणीही प्रस्ताव दिलेला नाही. प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू. मात्र, आम्ही कोणाकडे प्रस्ताव घेऊन जाणार नाही, असे शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.दरम्यान संध्याकाळी सव्वासात वाजता भाजपच्या कार्यालयातून ठाकरे यांना फोने आल्याचे सूत्रांनी सांगितले साडेसात वाजता भाजपच्या संसदीय समितीची बैठक सुरु असल्याचे वृत्त आले हि बैठक झाल्यानंतर भाजपच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे हि समजले
तत्पूर्वी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी वरील विधान केले.
ते म्हणाले, ‘अखंड महाराष्ट्र ठेवण्याचे कोणी आम्हाला वचन देत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ. तसेच, जर कोणाला शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर ते प्रस्ताव घेऊन येतील.‘तुम्ही स्वतःहून भाजपकडे प्रस्ताव घेऊन जाणार का असे विचारले असता ते म्हणाले, जर मी प्रस्ताव घेऊन गेलो आणि त्यांनी नाही म्हणून सांगितले तर काय.. त्यामुळे सध्या मी शांत आहे. त्यांना जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा असेल त्यांनी खुशाल घ्यावा. त्यांचे धन्यवाद.
महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवसेना जपेल. आम्हाला अपेक्षित होतं तेवढं यश मिळालं नाही, मात्र मतदारांनी जी साथ दिली तीच कायम ठेवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.