रविवार सुट्टीचा दिवस साधत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील
काँग्रेसचे उमेदवार विनायक निम्हण यांनी औंधगाव परिसरातील प्रमुख
सोसायटी, मंडळांबरोबरच दुकाने, भाजी मंडईमध्ये जाऊन मतदारांची भेट घेत
आज संध्याकाळी चर्चा केली. तसेच चर्च, गुरुद्वारामध्ये जाऊन आशीर्वाद
घेतले. यावेळी तेथील नागरीकांनी निम्हण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
असल्याचे सांगितले.
सायंकाळी सहाच्या सुमारास विनायक निम्हण यांनी औंध गावातील पुरातन
विठ्ठल मंदिर कोळीवाडा येथे जुनवणे परिवाराची बैठक घेतली. औंध गावातून
विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन यावेळी केले. नागरीकांनीही पक्षाबरोबरच
व्यक्ती म्हणूनही निम्हण यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यानंतर ते भैरवनाथ
मंदिर गावठाणात आले. भाजीमंडईतील व्यापार्यांना मत देण्याचे आवाहन करीत
ते चर्चमध्ये गेले. पिटर भाऊसाहेब चव्हाण यांनी निम्हण यांना आशीर्वाद दिले.
त्यानंतर गावठाणातील विविध सोसायट्यांना भेट दिली. मुलाणी वाड्याला भेट देत
धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले. विविध
कॉम्प्लेक्समध्ये जाऊन त्यांनी आवाहन केले. त्यानंतर ते जय महाराष्ट्र
चौकातील बाळासाहेब पवार यांच्या घरी भेट दिली. डिंबर समाज, शिंपी
समाजाचीही भेट घेतली. अनेक ठिकाणी महिलांनी निम्हण यांचे औंक्षण केले.
गुरुद्वाराला भेट देत तेथील धर्मगुरु समशेरसिंग मान यांचेही निम्हण यांनी
आशीर्वाद घेतले. निम्हण यांच्यासमवेत नगरसेवक सनी निम्हण, कार्यकर्ते
राहुल जुनवणे, समीर जुनवणे, सुनिल जुनवणे, तेजस बामगुडे, बाळासाहेब शेळके,
अल्लाउद्दीन पठाण, हरुण सवार, औंधगाव व्यायाम मंडळाचे अध्यक्ष अॅड.
तानाजीराव चोंधे, संचालक बाळासाहेब पवार, कैलास पवार, वसंतराव जुनवणे,
निलेश जुनवणे, रोहन कुंभार, पांडुरंग रानवडे, नितीन चोंधे, रुपेश जुनवणे, अशोक
रानवडे आदी सहभागी झाले होते.