आबा बागुलांवर अन्याय – जयश्री बागुलांचा लढा
काँग्रेस पक्षाने पर्वती मतदार संघातून उमेदवारी देताना आबा बागुल अन्याय त्यंच्या पत्नी जयश्री बागुल यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल तर केलाच पण आता प्रचारालाही प्रारंभ केला आहे त्यामुळे त्यांची माघार होईल कि खरोखर त्या लढा देतील हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे
आबा बागुल आता उपमहापौर आहेत , पक्षनेता , स्थायी समिती अध्यक्ष अशी पदे त्यांनी पक्षात भूषविली असली तरी त्यांचा या मतदारसंघात विकास कामांचा झपाटा हि प्रचंड आहे , मोफत काशीयात्रा सुरु करून त्यांनी जणू याबाबत राजकारण्यांना एक आगळा वेगळा मार्गच दाखविला . या मतदार संघात विविध लक्षवेधी प्रकल्प त्यांनी राबविले , घरा – घरात प्रत्येक माणसाशी संपर्क ठेवला या अनुषंगाने आज अजिंक्य मंगल कार्यालयात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यास प्रचंड गर्दी झाली होती तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे , स्वर्गीय नगरसेवक अरुण धिमधिमे यांची पत्नी वैशाली धिमधिमे , ओ बी सी महासभेचे प्रदेश अध्यक्ष पी बी कुंभार , क्रिकेट असोसिशन चे उपाध्यक्ष झुबेर पूनावाला , झोपडपट्टी जनविकास परिषदेचे विश्वास दिघे , गुलाबराव ओव्हाळ तसेच बाळासाहेब भांबरे आदींनी यावेळी जयश्री बागुलांना पाठींबा देणारी आणि काँग्रेस ने दिलेल्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त करणारी भाषणे केली हेमंत बागुल यांनी या मेळाव्याचे आयोजन केले
आबा बागुलांवर अन्याय – जयश्री बागुलांचा लढा
Date: