‘इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ अफ्रिका’ (इफ्सा) या पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्री वीणा जामकर यांना ‘टपाल’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘मैत्रेय मास मिडीया’ची पहिलीच निर्मिती अन् हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात सिनेमॅटोग्राफर ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेला ‘टपाल’ हा चित्रपट प्रसिद्ध लेखक मंगेश हाडवळे यांच्या लेखनातून साकारलेला आहे. या चित्रपटात अभिनेत्री वीणा जामकर यांनी पोस्टमास्तरची पत्नी असलेली ‘तुळसा’ची भूमिका अतिशय कुशलतेने साकारली आहे. इफ्सा पुरस्काराच्या रुपाने त्यांच्या अभिनयकौशल्याचा गौरव झाला आहे. यासोबतच ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनाही ‘अस्तु’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एकूण 15 भारतीय भाषांमधील चित्रपटांना इफ्साचे पुरस्कार प्रदान केले जातात. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला जातो. यामध्ये ‘टपाल’ला मिळालेले यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी गौरवास्पद आहे.
आफ्रिका फिल्म फेस्टिवल मध्ये वीणा जामकर सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्री
Date: