दिल्लीतील जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आम आदमी (आप) पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आलेले प्रवीणकुमार देशमुख हे मूळचे मराठी आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी प्रविणने नोकरी सोडून दिली. त्यानंतर केजरीवाल यांनी आपची स्थापना केल्यानंतर प्रवीण आपमय झाला. दिल्लीत 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपसाठी प्रविणने जोरदार काम केले. त्यानंतर आपच्या पहिल्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री झालेल्या मनीष सिसोदिया यांचे ओएसडी म्हणून काम पाहिले आहे. प्रवीणकुमारने आपला विजय हा प्रामाणिक व सत्य याचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. प्रवीणने टीआयटी कॉलेजमधून वर्ष 2008 मध्ये MBA केले आहे. भोपाळमधील अयोध्या बायपासजवळ प्रकाशनगर येथे त्यांचे कुटुंब राहते. एका चांगल्या नोकरीसाठी प्रविण दिल्लीत गेला होता. नोकरी चांगली मिळाली पण अण्णांच्या आंदोलनात सहभागी होत नोकरी सोडून दिली.प्रवीणचे वडील पी एन देशमुख भोपाळमधील एका पुलाच्या खाली टायर रिमोल्डिंग आणि पंक्चर काढण्याचे दुकान चालवतात. आता भोपाळमधील त्यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली आहे. प्रवीणचे आई-वडिल यांनी महिनाभर झाले दिल्लीत तळ ठोकला आहे. आता ते केजरीवाल यांचा शपथ ग्रहण समारंभ पूर्ण करून परतणार नाहीत.रवीण कुमार याच्याकडे खूपच तोकडी संपत्ती आहे. त्याच्याकडे रोख 20 हजार रुपये आहेत. तर, 6 हजार रुपये वसंत कुंज येथील आयसीआयसीआय बॅंकेत तर भोपाळमधील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया यात 1 हजार रुपये जमा आहेत. 2 लाख रुपयाची एलआयसी पॉलिसी आहे. याशिवाय भोपाळमध्ये त्याच्या नावावर 600 स्क्वेअर फूटाचा एक प्लॉट आहे. ज्याची बाजारकिंमत 5 लाख रूपये आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रविणकुमारने ही माहिती दिली आहे.