भारताचे शिखरवीर, विश्वविक्रमवीर असे अनेक विक्रम व उपाध्या धारण करणारा
आनंद बनसोडे याच्या मानात आणखी एक सोनेरी पंख खोवला असून कालच (ता.१६
रोजी) इंग्लंडच्या विश्वविक्रमाच्या विद्यापिठाने त्याला सर्वोच्च अशी
मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. त्याला “डॉक्टर इन रेकॉर्ड मेकिंग”
असा बहुमान देवून त्याचा सम्मान केला आहे. आनंदने आतापर्यंत चार खंडाच्या
सर्वोच्च शिखरांवर राष्ट्रगीत वाजवले असून “प्लेईंग मुझिक ऑन माउंटन” या
विषयावरील त्याच्या कार्याचा बहुमान म्हणून आनंदला हा संम्मान दिला आहे.
दिल्ली येथे झालेल्या भव्य समारंभासाठी विएतनामचे उच्चआयुक्त टोंग सीन
थे, विएतनाम बुक ऑफ रेकॉर्ड्स चे ली ट्रेन त्रोन, राजकारणी डॉ.व्होंग
कौंग ठौंग , इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स चे डॉ.विश्वरूप रॉय चौधरी हे प्रमुख
अतिथी म्हणून उपस्थित होते.
एखाद्या शिखरावर चढून गिटारवर संगीत वाजवण्याची आगळीवेगळी कल्पना ही
आनंदची स्वतची असून २००८ च्या १५ ऑगस्ट रोजी असा विचार त्याच्या मनात आला
होता. हा विक्रम करण्यापूर्वी आनंदने खूप तयारी केली होती. यामध्ये
गिटारची बांधणी पासून तापमान,वारा, हिमदंश (शरीराचा भाग गोठून जातो व तो
नंतर कापून काढावा लागतो), मेटलबाईट (बर्फात जर कोणत्याही धातूला स्पर्श
केला तर पूर्ण त्वचा त्या धातूला चिटकून फाटून जाण्याचा रोग) ई. अनेक
गोष्टीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी आनंदने ३ वर्ष खर्च केलेली आहेत.
कालांतराने १५ ऑगस्ट २०११ रोजी अमेरिकेतील कलिफोर्निया राज्यातील माउंट
शास्ता या शिखरावर आनंदने प्रथम राष्ट्रगीत वाजवून विक्रम केला होता.
जानेवारी २०१२ मध्ये “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” ने आनंदच्या या
विक्रमाला नामांकन देऊन आनंदसोबत “जगाच्या सर्वोच्च शिखरावरील मुझिक
कन्सट” हा विक्रम करण्यासाठी करार केला होता.८ एप्रिल २०१२ मध्ये
नेपाळमधील माउंट आयलंड, ६ मे २०१२ रोजी एव्हरेस्ट कॅम्प-२, १७ जुलै २०१४
रोजी युरोपातील सर्वोच्च माउंट एल्ब्रूस, १५ ऑगस्ट २०१४ रोजी आफ्रिकेतील
सर्वोच्च माउंट किलीमांजारो , ३ नोव्हेंबर २०१४ रोजी ऑस्ट्रेलिया मधील
माउंट कोस्कीस्झ्को या सर्व शिखरांवर भारताचे राष्ट्रगीत वाजवून आनंदने
विक्रम केले आहेत.
इंग्लंड मधील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, भारतातील लिम्का बुक, आशिया
बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडो-चायना बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड,
नेपाळ बुक ऑफ रेकॉर्ड, विएतनाम बुक ऑफ रेकॉर्ड ई. अनेक देशांच्या रेकॉर्ड
बुकशी संबंधित असलेल्या इंग्लंडमधील विश्वविक्रमांच्या विद्यापीठाने
आनंदला त्याच्या या आगळ्यावेगळ्या विक्रमाच्या कल्पनेवर व त्याच्या
पूर्ततेसाठी कराव्या लागणाऱ्या सर्व तयारीवर एक थिसीस लिहायला सांगितली
होती. “प्लेईंग मुझिक ऑन माउंटन” या विषयावर जवळपास 60 पानांच्या थिसीस
(शोधनिबंध) साठी आनंदला मानद डॉक्टरेट बहाल केली गेली आहे. या विषयावरील
आनंदची थिसीस जगभर “रेकॉर्ड रेफरन्स थिसीस” म्हणून वापरण्यात येणार आहे.
एखाद्या विक्रमांची कल्पना व त्याच्या पुर्ततेसाठीचे प्रयत्न कसे केले
जातात यासाठी जगभरातील विक्रम करणार्यांना याचा उपयोग होणार आहे.
रेकॉर्ड बुक व विक्रमांचा जज-
आनंदला आता स्वतचे रेकॉर्ड बुक सुरु करता येणार आहे. याबाबतीत तो लवकरच
घोषणा करणार आहे. तसेच कोणत्याही रेकॉर्ड साठीचे मुल्याकन करणे तसेच
रेकॉर्ड करताना पंच म्हणून जाण्याचा अधिकार आनंदला मिळणार आहे.
आई-वडिलांना समर्पित- आनंद बनसोडे
“९ वी नापास झाल्यानंतर पुढचे शिक्षण कधी घेवू शकणार नाही असे वाटत
असतानाच माझ्या आईने मला शिक्षणासाठी प्रेरित केले. वडिलांच्या
पाठींब्यामुळेच आतापर्यंत अनेक विक्रम करू शकलो आहे. त्यामुळे माझ्या
कुटुंबातील पहिली डॉक्टरेट त्यांना समर्पित करत आहे”