पुणे: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ मुलांची शैक्षणिक पुनर्वसनाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने घेतली असून त्यामध्ये १९३ मुले तर १३२ मुलींचा समावेश आहे. या पाल्यांचे समारंभपूर्वक स्वागत २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघोली येथे होणार आहे. तसेच पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट व सर्वपक्षीय मान्यवरदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसनाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने घेतली असून यामध्ये १९३ मुले व १३२ मुलींचा समावेश आहे. तसेच या मुलांचे ५वी ते १२वी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च भारतीय जैन संघटना करेल. पुण्यातील वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक संकुलात या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण केले जाणार असून, येथे राहण्याची सोयही करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबर ह्या जागतिक आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या आधार दिनी या मुलांचे पुनर्वसन करण्यात येईल व जैन संघटनेच्या वाघोली येथे निवास व शिक्षण दिले जाईल.
जैन संघटनेने या तीन जिल्ह्यातील ४२२ आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण केले आणि त्यातून बीड जिल्ह्यातील १०६ मुले आणि ७५ मुली, लातूर जिल्ह्यातील ३० मुले व १८ मुली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ५७ मुले आणि ३९ मुली यासाठी निवडण्यात आल्या आहेत. या सर्वांना वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात ठेवले जाणार आहे.
भारतीय जैन संघटना (बीजेएस) ही एक स्वयंसेवी संस्था आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. २०१३ च्या दुष्काळामध्ये बीजेएसने मराठवाड्यात विनाअनुदानित तत्वावर ३० ठिकाणी छावण्या उभारून १००००
जनावरांचे व्यवस्थापन केले होते. तसेच बीड जिल्ह्यातील ११५ तलावांचा गाळ पूर्णपणे काढून जिल्ह्यामध्ये एक विक्रम प्रस्थापित केला होता, त्याचा परिणाम म्हणजे जेव्हा २०१४ मध्ये चांगला पाउस झाला तेव्हा हे सर्व तलाव पूर्णपणे भरले होते. अशा प्रकारे बीजेएस दुष्काळामध्ये दूरदृष्टीने आप्पत्ती निवारण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून करीत आहे.
जनावरांचे व्यवस्थापन केले होते. तसेच बीड जिल्ह्यातील ११५ तलावांचा गाळ पूर्णपणे काढून जिल्ह्यामध्ये एक विक्रम प्रस्थापित केला होता, त्याचा परिणाम म्हणजे जेव्हा २०१४ मध्ये चांगला पाउस झाला तेव्हा हे सर्व तलाव पूर्णपणे भरले होते. अशा प्रकारे बीजेएस दुष्काळामध्ये दूरदृष्टीने आप्पत्ती निवारण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून करीत आहे.


