पुणे- स्मार्ट सिटी प्रकल्पावर खास सभेत आज मनसे च्या रुपाली पाटील यांचेया प्रकल्पाला विरोध करणारे खडाजंगी भाषण झाले आणि ते संपत असतानाच … मनसे गटनेते बाबू वागस्कर मोबाईलवर बोलत होते . रुपाली पाटील यांचे भाषण संपते न संपते तोच बाबू वागस्कर बोलले , आमचा स्मार्ट सिटी ला विरोध होता पण आता विरोध करणार नाही ,पण आमचे सदस्य यातील त्रुटी. आणि याबाबतच्या आपल्या भावना जरूर व्यक्त करतील , आताच मला मनसे प्रमुखांचा फोन आला होता , त्यंचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे आणि यातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे त्यामुळे आमचा या प्रकल्पास आता विरोध असणार नाही पण आम्ही आमच्या सूचना आणि यातील चुका दुरुस्त करण्याचा आग्रह करू ….
दुपारी साडेतीन वाजता बाबू वागस्कर यांनी हे सभागृहात सांगितले , रात्री उशिरापर्यंत सभा सुरूच होती .