पुणे- पाणी नाही ? रोजगार नाही ? पोट भरायला चला शहरात … हीच संकल्पना आता देशातील सरकार राबवू पाहते आहे ? स्मार्ट सिटी हा त्याचाच प्रकार आहे ? असला तर… देशभरातील खेड्यांचे होणार तरी काय ? यामुळे आख्खा भारत देश राहणार… आणि विभागणार फक्त १०० स्मार्ट सिटी मध्ये ? … आणि खेडी –गावे होणार इतिहासात जमा … ? शहरात आलेली खेड्यातील माणसे एक तर.. करणार गुलामी- चाकरी अन्यथा होणार गुंड ? असे नानाविध प्रश्न आता सतावू लागणार आहेत .
स्मार्ट सिटी म्हणजे होणार तरी काय? काय आहे हे गाजर? आणि सर्वसामान्यांना खरोखर होणार आहे काय, त्याचा फायदा ? असे अनेक प्रश्न आता उभे राहत आहेत . देशातील जनतेला आहे तिथे सुविधा पूरवा .. गाव सोडायला भाग पाडू नका .. हा विचार आता उरणार आहे कि नाही ? कि साऱ्या या १०० महानगरात देश एकवटणार आहे ? खेडी नामशेष होणार आहेत ? अशा प्रश्नांनी आता … अगोदरच जगण्यासाठी .. हैराण असलेले गावकरी आणखी हैराण होणार आहेत .
सन्माननीय नरेंद्र मोदी गुजरातचे .. जे आता देशाचे सर्वाधिक बहुमत असलेले असे ते खमके पंतप्रधान आहेत … समजा स्मार्ट सिटी हे जरी त्यांचे पूर्ण न होणारे स्वप्न असेल … तरी खेडी आणि तेथील साधारण माणूस अस्वस्थ होणार आहे …. खेड्यातील जागेला आता किती भाव मिळणार आणि शहरातील जागेची किंमत किती वाढणार ? हे सारे प्रश्नच प्रश्न , नव्या स्मार्ट सिटी योजनेमुळे उपस्थित होणार आहेत .
बरे; स्मार्ट सिटी करणार -म्हणजे योजना राबविणार … योजना राबविणार म्हणजे … अनेकांना … (होय प्रथम उद्योजकांना) कामे मिळणार … आणि आधीच असुरक्षित असलेला कामगार .. पोटासाठी त्यांच्याकडे( त्या उद्योजकांकडे ) अजून वेगाने धावत जाणार ? म्हणजे भांडवलशाही आणि गुलामी हे चित्र कायमच राहणार ? देशातील सरकारे गरिबांना , गुलामीच्या चक्रातून कधी बाहेर काढणार ? याची काही योजना नाही काय ? आज देशातील ९५ टक्के कामगार असुरक्षित आहे ;साऱ्या कामगार चळवळी आजतागायत संपुष्टात आल्या आहेत … मुठ्भरांकडे हजारो कोटींची संपत्ती … आणि कोट्यावधी जनता … रोज पोटासाठी वाट्टेल त्या संघर्षात … हि अवस्था बदलणार आहे ? बदलण्यासाठी मोदी सरकार काही पावले उचलीत आहे ? आर्थिक विषमता … नष्ट करण्याएवजी, जातीय दरी वाढवून, आर्थिक विषमतेला फाटा देवून पुन्हा देश भांडवलदारांच्या हाती एकवटतो आहे … असे कोणी म्हटले तर… वावगे ठरेल ? प्रश्नच प्रश्न … सरकार कोणतेही येवू द्यात प्रश्नांमध्ये कमी होत नाही , वाढतच आहेत … पण आता काय ? किमान ५ वर्षे भाजपचे सरकार आहे … मोदींचे सरकार आहे .. त्यांचे काम – आणि त्यांच्या योजना – याबद्दल प्रश्न -संशय उपस्थित करून करून काही फायदा नाही … पाहू यात नेमके हे सरकार करते तरी काय ?
देव… नाही हो –५ वर्षे आता हेच आम जनतेचे भवितव्य ठरविणार आहेत .. हो , एवढे म्हणा नक्की , देवा … या सरकारकडून तरी सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारे काम होवू देत … खरोखर १०० शहरे नाहीत तर हा देशच स्मार्ट होवू देत ….

