देशाच्या विविध भागांमध्ये गेली पांच वर्षे यशस्वीपणे आयोजन केल्यावर आता ‘अॅक्वा लाइफ अँड मरीन स्पेशल शो’चे पुन्हा एकदा पुणे येथे आयोजन केले जात आहे. लौकिक क्रीएशन्सने आयोजित केलेले हे २५वे अॅक्वा लाइफ एक्झीबिशन पुणे येथील नळस्टॉप येथील कर्वे रोडवर सेंट क्रीस्पीन्स होम्स येथे २१ ते २५ ऑक्टोबर २०१५ दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत होत आहे. या अनोख्या अशा प्रदर्शनासाठी प्रवेशशुल्क मात्र ७० रुपये एवढे ठेवण्यात आले आहे.
या प्रदर्शनात १५० हूनही अधिक फिश टँक आणि माशांच्या ३०० हूनही अधिक प्रजाती ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी अॅक्वा लाईफमध्ये मरीन स्पेशल शो आयोजित केला गेला आहे. यावेळी ज्या दुर्मिळ जाती प्रदर्शनात असतील त्यांत ट्रिगर फिश, जेली फिश, लायन फिश, पिवळ्या शेपटीचे डॅमसेल्स, निळे डॅमसेल्स, स्टिंग रे, माता टँक, ग्रीन विंग सार्जंट, मून रेक, चेकर बोर्ड रेस, सोनेरी डोक्याचा गोबी, मूरीश आयडॉल, विम्पल, ब्लूरिंग एंजल, कुराण एंजल, ब्राऊन इल, क्लाऊन फिश, स्टोन फिश, बॅट फिश, फायर क्लाऊन आणि यलो बटरफ्लाय यांचा त्यांत समावेश आहे.
मत्स्यप्रेमींना या प्रदर्शनात माश्यांच्या दुर्मिळ प्रजाती पाहायला मिळणार आहेत. त्यांत अॅलीगेटर गार, आरोप्रियाना, ग्रे जायंट गुरामी, शोवेल नोज कॅटफीश, २ रेड आरोवाना, ब्लॅक घोस्ट आणि इतरही दुर्मिळ आकाराच्या माशांचा समावेश आहे.
अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे आयोजन करून त्या माध्यमातून दुर्मिळ अशा जातींबद्दल तसेच इतरही प्राण्यांबद्दल रसिकांमध्ये असलेली जिज्ञासा शमविणे हे उद्दिष्ट असते. त्याशिवाय युवकांमध्ये समुद्रजीवनाबद्दल प्रेम निर्माण करणे, हा हेतूही त्यातून साध्य होतो, असे उद्गार ‘अॅक्वा लाइफ अँड मरीन स्पेशल शो’ या प्रदर्शनाचे आयोजक असलेल्या लौकिक क्रीएशन्सचे लौकिक सोमण यांनी काढले.
गेली पाच वर्षे या प्रदर्शनाचे आयोजन देशाच्या विविध भागांमध्ये केले जात आहे. देशाच्या कोणत्याही भागातही हे आयोजन केले गेले तरी त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळतो. यावेळी पुणेकर आणि आसपासच्या उपनगरांमधील मत्स्यप्रेमींसाठी हे आयोजन केले गेले आहे.
या अनोख्या अशा प्रदर्शनासाठी प्रवेशशुल्क मात्र ७० रुपये एवढे ठेवण्यात आले आहे.
स्थळ- सेंट क्रीस्पिन्स होम्स, कर्वे रोड, नळस्टोप, पुणे
तारीख – २१ ते २५ ऑक्टोबर २०१५ ,
वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत.
प्रवेशशुल्क – ७० रुपये
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क -9096003300 / 9404683407