पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’च्या विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल फार्मसी विक’2015 मध्ये यश मिळविले. ‘इंडियन फार्मास्युटीकल असोसिएशन’, पुणे च्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा वीक ‘अँटीबायोयिक्सचा जबाबदारपणे वापर जीवन वाचवतो’ (ठशीिेपीळलश्रश णीश ेष अपींळलळेींळली- डर्रींशी ङर्ळींशी) या थीमवर आधारित होता.
‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’चे विद्यार्थी या ‘नॅशनल फार्मसी विक’मध्ये आयोजित 17 कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी यशस्वी कामगिरी केली. विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, प्रा.इरफान शेख, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी अभिनंदन केले.
‘नॅशनल फार्मसी विक’मध्ये पुण्यातील 21 फार्मसी महाविद्यालये देखिल सहभागी झाली होती. प्रा. रूक्साना रब आणि डॉ. दीलनवाझ पठाण यांनी ‘नॅशनल फार्मसी विक’चे समन्वयक म्हणून काम पाहिले.
निकाल:
प्रश्नमंजुषा : मुक्तादीर सय्यद आणि अंजुम पटेल (विजेतेपद),
जनरल अभियोग्यता चाचणी : नर्गिस हर्णेकर (विजेतेपद),
रूग्ण सल्ला : अंजुम पटेल, शादाब खान, सना बैग, दानिश आणि राहिल (उपविजेतेपद),
परिचर्चा-वक्तृत्व आणि गटचर्चा : तस्नीम मांजरा

