पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’च्या वतीने दिनांक 15 जानेवारी ते 17 जानेवारी 2015 दरम्यान, ‘इर्मजिंग ट्रेडस् इन फार्माक्युटिकल आर अॅण्ड डि अॅण्ड ड्रग डिसकव्हरी ’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता आझम कॅम्पसच्या पीएआय हायटेक सभागृहात होणार आहे, अशी माहिती प्राचार्य आणि परिषदेच्या निमंत्रक डॉ. किरण भिसे यांनी दिली. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’ च्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेचे उद्घाटन डॉ.पी.डी.चौधरी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फार्माक्युटीकल सायन्सेस चे अधिष्ठाता)यांच्या हस्ते होणार आहे. आबेदा इनामदार (उपाध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी) यांच्या अध्यक्षतेखाली, प्रा. इरफान शेख, सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, मुझफ्फर शेख, खालिद अन्सारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.