चेन्नई: बेंगलुरूच्या कोर्टानेसाडेसहासष्ट कोटींची संपत्ती सापडल्यामुळे एआयएडीएमकेच्या अध्यक्षा जयललिता यांना दोषी ठरवल्यानंतर जवळपास 6 जणांनी आत्महत्या केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे तर 10 जणांना हृदयविकाराचा झटका आला आहे. याशिवाय दोन जणांनी स्वतःला आग लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एक 12वीत शिकत असलेला विद्यार्थी आहे. तर दुसरीकडे त्रिपूर येथे एआयएडीएमके समर्थकाने आपले बोट कापून घेतले आहे. जयललिता यांच्या विरूध्दचा आरोप सिध्द झाल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. सोमवारी जयललिता यांच्या जवळचे पनीरसेल्वम यांना पक्षातर्फे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आले असून ते आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.असे वूत्तसंस्थांनी म्हटले आहे
तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांना 18 वर्षे जुन्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षे कारावास आणि 100 कोटी रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना बेंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद करण्यात आले आहे. जयललिता या ठिकाणी कैदी क्रमांक 7402 आहेत. विशेष म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी सुविधा पुरवण्यात आलेली नाही.
सोशल वेलफेअर फंडचे चेअरमन आणि एआयएडीएमकेच्या महिला विंगची उपसचिव सी. आर. सरस्वती म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक जण जयललिता यांना आईप्रमाणेच मानतो. पक्षाच्या नेत्यांकडून चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे कोणतेच पाऊल उचलून नये असे अपिल केले आहे.
अम्मा तुरुंगात गेल्याने सहा आत्महत्या …
Date: