अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आम्ही घडवू-नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

मुंबई:
छत्रपतींचं नाव घेणं हा गुन्हा असेल तर मी तो पुन्हा पुन्हा करायला तयार आहे. जो आपलं दैवत, आईवडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाही. ज्यांची शपथ घेऊन हा कारभार आपण सुरू करत आहोत त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आम्ही घडवू, अशी ग्वाही देत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात विरोधकांना फटकारले.’शिवरायाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार…’अशा शब्दांत उद्धव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘आयुष्यात पहिल्यांदाच मी या सभागृहात आलो आहे. सभागृहात आलो हे माझं भाग्य. येताना छत्रपती शिवरायांना वंदन करू आलो. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे. हे दैवत ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीत जन्माला आलेले आपण सारे शिवभक्त. या सभागृहात वागायचं कसं, हा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण मी मैदानातला माणूस, मला वैधानिक कामाचा अनुभव नाही. पण इथे आल्यावर वाटलं की यापेक्षा मैदानात बरं असतं. आज मी मोकळ्या बाकांशी लढणार नाही. मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणारा मी नाही. मी शत्रूला अंगावर घेणारा आहे.’ ‘सभागृहात आल्यानंतर मी या फुले, शाहू, आंबेडकरांच्या तसबिरी पाहिल्या. छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र, असं आपण केवळ भाषणात म्हणायचं आणि प्रत्यक्षात या महापुरुषांचा आदर ठेवायचा नाही, याला काय अर्थ? केवळ छत्रपतींचं नाव घेऊन शपथ घेतली तर यांना इंगळ्या डसाव्या? हो, मी छत्रपतींची शपथ घेतली, मी पुन्हा घेईन, मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतली, मी पुन्हा घेईन. छत्रपतींचं नाव घेणं हा गुन्हा असेल तर मी तो एकदा नाही, दहादा नाही, प्रत्येक जन्मात करीन,’ असं उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितलं.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...