पुणे – निकालाआधीच वृत्तवाहिन्यांनी निकाल ‘एक्झिट पोल’ म्हणून जाहीर करून -वारंवार हा ‘एक्झिट पोल’जनमानसावर बिंबवून तशीच मानसिकता तयार करण्याचे आरंभल्याने भाजप वगळता अन्य राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत आहेत दरम्यान भाजपचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत अमित शहा ठरवतील असेही दिसत आहे भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मात्र महाराष्ट्राची दिल्ली सारखी अवस्था होण्याची शक्यता आहे (म्हणजे ‘आप ‘ आणि काँग्रेस च्या सरकारची अवस्था काय झाली हे सर्वांना ठावूक आहे )भाजपच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे, की जर पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही, तर शिवसेनेची मदत घेण्याऐवजी राज्यात राष्ट्रपती राजवटच कायम ठेवावी. आणि अशा राजवटीत महाराष्ट्रांची अवस्था जटील होण्याची शक्यता आहे . मात्र अजूनही अनेकांना शिवसेनेची सत्ता येईल असे वाटत आहे . जर शिवसेनेला बहुमत मिळाले नाही तर अन्य प्रादेशिक पक्षांचा पाठींबा घेवूनही शिवसेना सरकार स्थापन करू शकेल . पण कोणत्याही परिस्थितीत आता अफजलखानच्या फौजेशी संग नको असा मतप्रवाह हि सेनेतून व्यक्त होताना दिसतो आहे. मतदानापूर्वी अफजलखान संबोधून ज्यांच्यावर हल्ला केला – ज्यांनी ‘उंदीर’ अशी संभावना केली अशा असंगाशी शिवसेना संग करेल काय ? या प्रश्नाचे उत्तर आता निकालानंतरच मिळणार आहे, नाही तर ‘मतदानापूर्वी शत्रू आणि मतदान संपते न संपते तोच गळ्यात गळे ‘सत्तेसाठी पुन्हा वाटाघाटी हे राजकारण पाहता पाहता महाराष्ट्राची जनता आती विटली आहे पण नेमके काय महाराष्ट्राच्या नशिबी येणार ? ते मात्र १९ ताखेलाच समजणार आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल १९ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. दरम्यान त्याआधीच मुख्यमंत्रीपदावरुन दावेदारी सुरु झाली आहे. प्रदेश भाजपचे तीन दिग्गज – देवेंद्र फडणवीस ,पंकजा मुंडेआणि एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर दावा अथवा त्यासंबंधीचा इशारा केला आहे. दरम्यान, पक्षाने निवडणुकीनंतरच्या रणनीतीला सुरवात केली आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे, की त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे की त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथून निवडणूक लढविली आहे.
दुसरीकडे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे, की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पक्षाची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांना आहे. फडणवीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्यावर वेळोवेळी विश्वास व्यक्त केला आहे.४४ वर्षीय या नेत्याला संघाचा पाठिंबा सहज मिळू शकतो. मुख्यमंत्रीपदाबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीही शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत, मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय संसदीय मंडळ ठरवेल. संसदीय मंडळ मला जी जबाबदारी देईल ती मला मान्य असेल, असे सांगण्यासही ते विसरले नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे, की विरोधी पक्षनेत्याची ही माझी शेवटची वेळ आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन अंदाज लावता येऊ शकतो, की पक्ष सत्तेत येणार आहे याबाबत ते किती शाश्वस्त आहेत .
दरम्यान ‘एक्झिट पोल’हा काही निकाल नाही पण तरीही त्यावर सध्या बरेच विसंबून वागत असल्याने संशयाचे वातावरणही तयार होवू पाहते आहे