पुणे–ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांना 3 वेळा धमकीची पत्रे आली -पोलिसात गुन्हे दाखल झाले पण तपास शून्य … अशी अवस्था का ? कोण पाठवतात असी पत्रे ? याबाबत पोलिसांना यश का येत नाही ? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत . काल राळेगण सिद्धी येथे अण्णांना पत्र पाठवून जिवे मारण्याची धमकी दिली होती व त्या प्रकारणी भ्रष्टाचार निर्मूलन न्यास राळेगण सिद्धी या संस्थेच्या माध्यमातून पारनेर जिल्हा अहमदनगर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अण्णा हजारे यांचे पुणे येथील वकील अॅड मिलींद दत्तात्रय पवार यांनी अण्णांना वरील आलेल्या धमकी पत्राची दखल घेऊन आज मुख्यमंत्री, गृहमंत्री, व केंद्रीय गृहमंत्री यांना स्पीड व रजिस्टर पोस्टाने व मेल पाठवून अण्णांना विशेष दर्जा असलेली झेड प्लस ही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी अशी मागणी केली आहे.
अॅड मिलींद दत्तात्रय पवार हे पत्रात म्हणतात अण्णा सुरक्षा स्वीकारण्यास नकारच देतील परंतू सरकारची जबाबदारी म्हणून अण्णा हजारे यांना झेड प्लस ही सुरक्षा पुरविण्यात आली पाहिजे.
दाभोळकर व पानसरे यांचे मारेकरी अद्याप पकडले गेले नाहीत. ठराविक नेत्यांच्या विरोधात बोलल्यावर असले प्रकार वाढु लागलेत की अशी शंका निर्माण होत आहे.
आज पर्यन्त अण्णा हजारे यांना 3 वेळा धमकीचे पत्र आलीत परंतु अद्याप एकाही पत्रकाचा लेखक किंवा धमक्या देणारा सापडला नाही व ही बाब फार गंभीर आहे व म्हणून वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
अण्णा हजारे यांच्या जिवाला काही धोका निर्माण झाल्यास वा कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असे पत्रात नमूद केले आहे.