नवी दिल्ली – अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात किरण बेदी या भाजपसाठी हेरगिरी करत होत्या काय? आता आप चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे .
कुमार विश्वास म्हणाले की, इंडिया अगेन्स्ट करप्शन (आयएसी) च्या टीममध्ये सर्वांना किरण बेदींवर संशय होता. तो संशय आता खरा ठरा आहे. बेंदी मुंख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बनल्याने आपलाच फायदा होणार आहे. कारण भाजपकडे केजरीवालांच्या तोडीचा उमेदवार नसल्याचे त्यावरून स्पष्ट होते. तर मनीष शिसोदिया यांनी किरण बेदी भाजपसाठी आंदोलनात उतरल्या होत्या असा आरोप केला आहे. एकेकाळी ज्या काळ्या पैशाच्या मुद्यावरून बेदी भाजपवर टीका करायच्या तोच काळा पैसा त्यांना आता आपलासा वाटत असल्याचेही ते म्हणाले. तर किरण बेदींनी भाजप विरोधात जी वक्तव्ये केली होती, त्यावर आता त्या काय उत्तर देतील, अशा शब्दांत विचारणा केली.
दरम्यान, आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असताना किरण बेदी मात्र प्रचारामध्ये व्यस्त आहेत. शुक्रवारी बेदी यांनी त्यांचा मतदारसंघात रिक्षामध्ये प्रचार केला. बेदी म्हणाल्या की, लवकरच लोकपालची नियुक्ती केली जाणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे.

