पुणे- आज अमिताभ बच्चन , शाहरुख खान , सलमान खान अशी बडी बडी स्टार मंडळी जरी छोट्या पडद्यावर येण्यासाठी लक्षपूर्वक वाटचाल ठेवीत असली आणि झी टीव्ही च्या माध्यमातून ‘चला हवा येवू द्या’च्या कार्यक्रमातून जरी मी घराघरात पोहोचलो असलो तरीही … मी इथे हिरो होण्यासाठीच आलो होतो ; स्ट्रगल केला तो हिरो होण्यासाठीच … आता दिग्दर्शक झालो आहे , भविष्यात निर्माता हि होईल पण … अजूनही आहे ते स्वप्न उराशी … मोठ्ठ्या पद्यावरचा हिरो होण्याचे ….असे सांगत अभिनेता निलेश साबळे म्हणाला , आयुष्यात स्ट्रगल खूप केले पण म्हणावे तसे समाधानकारक यश मिळाले नाही अशा वातावरणात झी टीव्ही ची साथ मिळाली आणि आयुष्यात आता रंगबिरंगी हवा येवू लागली आहे हे खरे आहे . आता टीव्ही वरून खूप प्रसिद्धी मिळाली आहे पण तरी हि मोठ्ठ्या पडद्यावरचा हिरो होण्याचे स्वप्न अजूनही उराशी आहेचआज निलेश साबळे ‘चला हवा येवू द्या ‘ च्या टीम सह पुण्यात आला होता . यावेळी तो बोलत होतामुळचा पुणे जिल्ह्यातील सासवडचा असलेला निलेश पुण्याबद्दल बोलताना पहा काय म्हणाला ….
अजूनही आहे ते स्वप्न उराशी … मोठ्ठ्या पडद्यावरचा हिरो मनाशी … डॉ. निलेश साबळे
Date:

