अच्छे दिन — माधुरी -बच्चन -पासून ते रामदेवबाबा ;रविशंकर जी सगळ्यांसाठी मोदी महाल खुला ….
नवी दिल्ली, -‘बेटी बचावो ; बेटी पढाओ ‘ अभियानाच्या ब्रांड अम्बेसिडर म्हणून माधुरी दिक्षित ची वर्णी लागल्यानंतर आता शहेनशाह -डॉन अमिताभ बच्चन आणि योग गुरु रामदेवबाबा -रविशंकर जी यांच्यासाठी मोदीमहाल खुला होत असल्याचे चित्र आहे . त्याबाबत चे वृत्त असे आहे कि , भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, अभिनेते अमिताभ बच्चन, योगगुरू रामदेव बाबा आणि अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर यांचा ‘पद्म’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकार भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘पद्म’ पुस्कारांची घोषणा करण्यात आली असून या यादीत एकूण १४८ जणांची नावे आहेत. लाकृष्ण आडवाणी व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिगं बादल या दोन राजकीय नेत्यांचा या यादीत समावेश आहे. तर अभिनेता अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, लेखक सलीम जावेद तसेच गीतकार प्रसून जोशी यांनाही पद्म पुरस्काराने गौरवण्यात येईल.
बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, हॉकी टीम कप्तान सरदारा सिंग, चेस ग्रँडमास्टर शशीकिरण कृष्णन या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचाही या यादीत समावेश आहे.