‘अच्छे दिन ‘ ची दिशाभूल करणाऱ्या मोदी सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून निषेध – युवक शहराध्यक्ष अजित बाबर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने
पुणे :
‘अच्छे दिन ‘ आल्याची बतावणी करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारच्या दिशाभूल करण्याचा निषेध आज पुण्यात वर्ष पूर्ती निमित्त करण्यात आला . राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने पुणे शहराध्यक्ष अजित बाबर आणि शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष रिझवान शेख यांच्या नेतृत्वाखाली युवक कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक धरून आणि गाजरे धरून बाल गंधर्व जवळ संभाजी उद्यानाच्या प्रवेश द्वाराजवळ हे आंदोलन करण्यात आले .
कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली . फलक झळकावले . केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचा कार्यक्रम बालगंधर्व मध्ये सुरु असताना बाहेर संभाजी उद्याना जवळ आंदोलन सुरु होते . ‘ पुण्याच्या मेट्रोची तारीख सांगता येणार नाही आणि पुणे ही आधीपासून स्मार्ट सिटी आहे ‘ असे नायडू यांनी जाहीर केल्याचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी पुणेकरांच्या फसवणुकीचा ही निषेध या वेळी घोषणा देवून केला
अजित बाबर म्हणाले ,’ सतत परदेश वाऱ्या करून आणि शेतकरी -सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून मोदी यांनी फसवणूक आणि दिशाभूल केली आहे . काळा पैसा ,महागाई अशा अनेक मुद्द्यांवर यु टर्न घेतले आहेत . मोदी सरकारचे पहिले वर्ष हे केवळ दिखावू पणा , हात चलाखी आणि पर्यटनाचे वर्ष ठरले आहे ‘
घोषणा देवून युवक कार्यकर्त्यांनी चौक दणाणून सोडला . यावेळी शहर अध्यक्ष अजित बाबर ,शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष रिझवान शेख, रवींद्र माळवद कर ,बाळासाहेब बोडके , राजेंद्र दळवी ,मंगेश मोरे ,रोहित मोरे ,अमित कडू ,अतुल हिंगमिरे ,संतोष ढोक ,गणेश गंगावणे ,मधुर आमले ,सचिन बेनकर ,शुभम भोसले ,सागर कोद्रे ,सुशांत बाबर ,पवनराजे बमबुळगे हे उपस्थित होते .