अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या पुणे शहर जिल्हा अध्यक्षपदी मनोज पटेलिया यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचे पत्र अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपिन कुमार यांनी दिले .
मनोज पटेलिया यांनी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष काम केले आहे . भारतीय सफाई कामगार स्वछ संघटन पुणे शहर अध्यक्षपदी काम केले आहे . मेहेतर वाल्मिकी विकास संस्था वधू – वर सूचक समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष , खान रोड बेडा पंचायत पंचप्रमुख आणि अन्य संघटनावर कार्यरत आहे . आदी संघटनावर काम केले आहे .
त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांनी सांगितले , या पदाच्या माध्यमातून समाजासाठी विशेष कार्यरत राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली . सफाई कामगाराचे प्रश्न सोडविणार आहेत , असे त्यांनी सांगितले .